साबुदाण्याची गोड खिचडी (Sweet Tapioca Khichadi)

(Link to English Recipe)

माझ्या आज्जीचा सोमवारी उपवास असे. पण त्यादिवशी ती मीठ खायची नाही. तसे तर ती फार काहीच खायची नाही. एखादा चहा दिवसभरात, असेल तर एखादे केळ यावर तिचा उपास चाले. पण एखादेवेळी आमच्या आग्रहाखातर ती साबुदाण्याची गोड खिचडी करत असे. तिच्या हातची ही खिचडी खाऊन आता १५+ वर्षे झाली. मम्मी करते कधीतरी आमच्यासाठी. आज अचानक तिची खूप आठवण झाली म्हणुन हा पोस्ट प्रपंच.

१ कप भिजवलेला साबुदाणा
१/४ कप दाण्याचे कुट
१/४ कप साखर
१ चमचा तूप (वगळले तरी चालेल)
थोडेसे खोवलेले ताजे खोबरे

कृती - 
१. दाण्याचे कुट आणि साबुदाणा एकत्र करुन घ्यावा.
२. वापरणार असाल तर जाड बुडाच्या कढईत तूप तापवा. त्यात साबुदाणा घालून बारीक गॅसवर परतावा. खिचडी परतून करतो त्या पद्धतीने करुन घ्यावी.
३. गॅसवरुन उतरवून खिचडीची एक वाफ जाऊ द्यावी. त्यावर साखर घालून मिसळून झाकण ठेवावे.
४. वाफेने आणि गरम खिचडीने साखर विरघळून खिचडीला चिकटते.
५. वरुन ताजे खोबरे शिवरुन आस्वाद घ्यावा

टिपा - 
कढईत परतत असताना साखर घालू नये. करपण्याचा संभव असतो.
या खिचडीला तेल तूप नसले तरी चालते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Best Pulav Ever

Green Curry Noodles

Achari Paneer